भद्रावती : आजारी होऊन शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या मनस्ताप सहन करण्यापेक्षा निरोगी जीवनशैलीसाठी आरोग्य विषयक जागरूकता निर्माण होणे ही काळाची गरज आहे. जीवनशैलीत थोडासा बदल केल्यास आरोग्य चांगले व निरोगी राखता येते असे विचार पुणे येथील सुप्रसिद्ध एमडी आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट डॉ. लक्ष्मीकांत कोर्तीकर यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र – मंडळ आणि स्थानिक विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ या विषयावर व्याख्यान करताना बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मंचावर योद्धा संन्याशी पालक मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे,सचिव माधव कवरासे उपस्थित होते. यावेळी डॉ.कोर्तीकर यांनी उपस्थितांना सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदिक औषधे कशी महत्वाची आहेत ते सविस्तर समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम मत्ते संचालन प्रा. अमोल ठाकरे, आभारप्रदर्शन माधव कवरासे यांनी केले. यावेळी
योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे पदाधिकारी विठ्ठल मांडवकर, अण्णा कुटेमाटे, चंपत आस्वले, डॉ.प्रकाश तितरे यांच्यासह भद्रावती शहरातील अन्य मान्यवर, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.