गोंडपिपरी :-बाजार समितीची निवडणूक आता रंगात आली आहे.गुरुवार(दि.२०) निवडणूक न लढविणाऱ्या उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस राहिल्याने अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.यामूळे आता लढती स्पष्ट झाल्या आहेत.काॕग्रस समर्थित पॕनल आणि भाजप समर्थित पॕनल आता आमणे – सामणे उभी ठाकली आहे.अश्यातच नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला.यावेळी सहकार क्षेत्रातील अनेक मात्तबरांनी मैदान सोडून आपली उमेदवारी “विड्राॕल” केली.मात्र चर्चा झाली ती केवळ कुडेसावली सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांची.मुळचे परसोडी येथिल असलेले जानकीराम आडकुजी सुर असे या व्यक्तीमत्वाचे नाव आहे.सुर यांनी भाजपा नेते,माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अर्ज मागे घेतला.ते मागिल २० वर्षापासून कुडेसावली सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धूरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.११ संचालक अविरोध निवडून आणत ही मालिका त्यांनी सुरू ठेवली आहे.अश्यातच त्यांनी बाजार समितीच्या या निवडणूकीत सेवा सहकारी गटातून आपला उमेदवारी अर्ज स्वतंत्ररित्या दाखल केला होता.मात्र सर्व चित्र बघता त्यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजप समर्थित परिवर्तन शेतकरी सहकारी पॕनलला समर्थन दिले आहे.कुडेसावली सेवा सहकारी संस्थेचे सर्व संचालक यांचेसह परिसरातील संपर्कात असलेल्या मदरांराचा पाठिंबा यावेळी त्यांनी अमर बोडलावारांच्या नेतृत्वात असलेल्या पॕनलला जाहिर केला आहे.
गोंडपिपरी बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा काॕग्रस समर्थित पॕनल आणि भाजप समर्थित पॕनल आता आमणे – सामणे उभी आहे.अश्यावेळी भाजप समर्थित पॕनलला मिळणारे पाठबळ निर्णायक ठरणारे आहे.भाजप समर्थित पॕनलकडून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल आणि त्यांचे खंदे समर्थक बंडू वाकूडकर मैदानात असल्याने भाजपची ताकत वाढली आहे.याउलट काँग्रेस समर्थित पॕनलमध्ये आॕलबेल नसल्याचे बोलल्या जात आहे.निवडणूकीपूर्वीच “त्यांच्यात” उघड गटबाजी दिसून येत आहे.आज(दि.२१) चिन्ह वाटपानंतर अधिक रंगत अधिक वाढणार आहे.