गोंडपिपरी(सुरज माडुरवार):- मझब नही सिखाता आपस मे बैर रखना हिंन्दी हे हम वतन हे हिंदुस्ता हमारा हे ब्रिदवाक्य घेऊन नुकतच गोंडपिपरी येथे पोलीस विभागातर्फे मुस्लिम बांधवांसाठी मक्का मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी देखील यात सहभाग घेत उपस्थिती दर्शवली.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव इफ्तार सोडण्यासाठी आले.समाजात मोठ्या प्रमाणात काही समाज कंठकांकडुन हिंदू-मुस्लिम धर्मामध्ये अनेक स्तरावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी केल्या जात असतो तशा घटना देखील घडत असतात.इफ्तार च्या निमित्याने एक सामाजिक सलोखा राखला जावा या उदात्त हेतूने कर्तव्यासोबतच सामाजिक सलोखा जपण्यासाठी ठाणेदार जीवन राजगुरू,पीएअआय धर्मराज पटले यांच्या मार्गदर्शनात इफ्तार आयोजित केली होती.यावेळी मुस्लिम बांधवांसह मोठ्या संख्येने विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकारी,तालुक्यातील नागरिकांची,नगरसेवक,बाजारसमिती पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,प्रतिष्टीत व्यापारी व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी गोंडपिपरीत हिंदू मुस्लिम बांधवांकडून एकोप्याचे दर्शन पाहायला मिळाले.