चंद्रपूर :- ग्रामगीतानेच आदर्श गावाची संकल्पना पूर्ण होवू शकते असे मत गुरूदेव प्रचारक डॉ. अंकुश आगलावे यांनी श्री. गुरूदेव सेवा मंडळ, चंद्रपूर व्दारा आयोजित राष्ट्रीय ग्रामजयंती महोत्सव 2023 कार्यक्रमात समारोपीय भाषण करतांना मांडले.
डॉ. आगलावे पुढे म्हणाले की देशाचा कारभार संविधाने तर गावाचा कारभार ग्रामगीताने चालतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाने शिक्षण अपुरे असूनही ग्रामगीता ही संस्कृतमध्ये अध्यात्माच्या भरवश्यावर लिहली.
डॉ. आगलावे यांनी पुढे सांगितले की रा.संत तुकडोजी महाराजाचे शिष्य तुकाराम गिताचार्य होते तसेच घटना मसुदा समितीचे सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ग्रामगीताचार्य तुकाराम दादा यांचे सबंध अतिशय जवळचे होते. तुकाराम गीताचार्य म्हणतात की लोकशाही मध्ये आमदार, खासदार हे मुनीमचे कार्य करीत असून जनता ही मालक असते. ग्रामगीताचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे. .
यावेळी मंचावर रवि मानव अध्यक्ष श्री गुरूदेव अध्यात्म गुरूकुल मोझरी, श्री. गुरूदेव अध्यात्मक गुरूकुल अडयाळ टेकडी अध्यक्ष सुबोध दादा,गुरूदेव प्रचारक सर्वाधिकारी वाल्मिकी वैद्य गुरूजी, देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष, किसान पुत्र संघटननेचे नरेंद्र जीवतोडे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हयातील श्री गुरूदेव प्रचारक व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.