गोंडपिपरी:- तालुक्यातील वढोली येथील ग्राम पंचायत परिसरात वाचनालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून कामाचे माहिती फलकसुद्धा लावण्यात न आल्याने ग्राम पंचायत सदस्य संदीप पौरकार यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागमी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र २ चंद्रपूर खनिज विकास निधी अंतर्गत वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.वर्षभरापासून बांधकाम सुरू असून कंत्राटदाराचे व अधिकाऱ्यांचे कामावर नियंत्रण नसल्याचे पाहायला मिळत आहे.कामावर पाण्याचा वापर करत नसून इमारतीचे मजबुतीकरण कसे होणार असा प्रश्न उपस्थित करत निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रा पं सदस्य पौरकार यांनी केली आहे.