गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):- परिसरातील नागरिकांना जीवनदान देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी लाखोंची जागा भंगाराम तळोधी येथे रोड लगत असलेली जागा शासनाला दान करणाऱ्या दानशूर विवेक गोनपल्लीवार यांचा प्रजासत्ताक दिनी माजी जी प सदस्य अमर बोडलावार,ग्रा पं सदस्य जयेश कार्पेनवार यांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीतीत करण्यात आला.
२०१३ मध्ये खनिज निधी अंतर्गत २० लक्ष रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत भंगाराम तळोधी साठी मंजूर झाले.पंरतू जागा उपलब्ध नसल्यामूळे अनेक महिने ईमारत बांधकाम सूरू होऊ शकले नाही.जागेची अडचण लक्षात घेऊन नेहमी सामाजिक जोपासणारे लोकांचे दुःख टिपणारे गावातीलच प्रतिष्टीत व्यापारी विवेक गोनपल्लीवार यांनी स्वमालकीची जागा प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारतीसाठी दान दिले आर्थिक दुर्बल घटकांसाठी देवदूत बनले.पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांनी आधूनिक सुविधायुक्त सुसज्ज ईमारत ऊभी होण्यासाठी निधी वाढवून ८ कोटीची निधी उपलब्ध करून दिले.प्रदिर्घ काळाचा प्रतीक्षेनंतर रूग्णांचा सेवेसाठी ईमारत सज्ज झाली.ईमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आदर्श व्यक्तिमत्त्वाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प शाळा भंगाराम तळोधी येथे सन्मान करण्यात आला .यावेळी मा जि.प.सदस्य अमर बोडलावार,सरपंच बालूगवार,उपसरपंच सूरेंद्र घाबर्डे,ग्रा. पं.सदस्य जयेश कार्पेनवार,अर्चना कावळे,मनोज सिडाम,सहदेव रेड्डी,संजय गोविंदवार,राकेश कटकमवार,सतिश दोरीवर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती