शेकडो महिलांची उपस्थिती
वरोरा :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कोरोणा काळात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख स्वरुपात सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. येवढ्या कठीण काळात त्यांनी गोर गरिबांसाठी खूप मोठे कार्य केले होते. त्याच संस्काराचे पाईक राहून आम्ही त्यांचेच शिवसैनिक आहोत. या मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिक हा भाऊ, कुटुंब प्रमुख सारखा आपल्या सुख दुःखात सदैव पाठीशी उभा असेल, असे मत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
ते हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून, शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ व शिवसेना महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ प्रमुख प्रा. शिल्पा बोडखे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा महिला आघाडीतर्फे दिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत आयोजित हळदी कुंकू व महिला स्नेहमिलन सोहळा खांबाडा व टेमुर्डा येथे आज (दि.२६) ला पार पडलेल्या सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे पाहिलें सत्र सकाळी ११ वाजता खांबाडा येथील विवेकानंद पब्लिक स्कूलच्या प्रांगणात पार पडले. सदर कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष नर्मदा दत्ता बोरेकर, शिवसेना वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावतीच्या माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया नारळे,
भद्रावती शहर प्रमुख शिला आगलावे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला मालोकर यांनी केले तर आभार शिला आगलावे यांनी मानले.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र टेमुर्डा येथील ग्रामपंचायत सभागृहात दुपारी २ वाजता पार पडले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष नर्मदा दत्ता बोरेकर, शिवसेना वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावतीच्या माजी नगरसेविका सुषमाताई शिंदे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया नारळे, टेमुर्डा ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकरे, वरोरा उप तालुका प्रमुख गजानन गोवरदिपे, अशोक गेडाम , भद्रावती शहर प्रमुख शिला आगलावे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला मालोकर यांनी केले तर आभार गजानन गोवारदिपे यांनी मानले.
विदर्भस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निवड झाल्या बद्दल पिजदुरा येथील कु.आचल प्रभाकर तोडकर या मुलीचा रवींद्र शिंदे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .