भामरागड: – तालुक्याला 128 गावे जुडून आहेत आणि यात एकूण 19 ग्रामपंचायत व भामरागड तालुका मुख्यालयात नगरपंचायत कार्यरत आहे . या सर्व स्थानिक स्वराज्य स्वस्थांनांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर होऊन येतात तसेच घरकुल,वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, पुलाचे बांधकाम,रपटे,नाली,सिमेंट रस्ते,समाज मंदिर बांधकाम,गोटूल इत्यादी कामे केली जाते यात मोठ्या प्रमाणात सिमेंट चा वापर होतो. मात्र येथील स्थानिक कंत्राटदार व मिस्त्री यांना सिमेंट चा योग्य वापर व प्रमाण बद्दल व्यवस्थित माहिती नसल्याने अनेकदा काम हे दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे सदर कामे करतांना सिमेंट सोबत इतर साहित्याचे प्रमाण किती असायला पाहिजे आणि काम पूर्ण झाल्यानंतर किती दिवस पाणी घालायला पाहिजे या सर्व बाबींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली
तसेच प्रोजेक्टर चा वापर करून विविध चित्रफिती व फोटो द्वारे त्यावर अधिक प्रकाश घालण्यात आले.यावेळी कंपनीचे अखिल कोचे, अमोल लोणारे,सुशील मून हे उपस्थित होते तसेच तालुक्यातील रजिस्ट्रेट कंत्रादार शामराव येरकलवार, जगदीश कोंकमूट्टीवार, रामचंद्र दुर्गे,ज्ञानेश्वर भांडेकर,पप्पू आझाद,रामचंद्र दुर्गे,महेश मद्देर्लावार,लालसू आत्राम,संतोष भुरसे,सैनु आत्राम,सुनील रॉय,मल्लेश, संजय नैताम, प्रमोद पिपरे,मंगल सरदार,जाधव हलदार,देवाशिस बिस्वास,विनोद पडालवार,सलीम शेख, जितेंद्र तेलामी,तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी,पत्रकार रमेश मारगुनवार,गोविंद चक्रवर्ती, कवीश्वर मोतकुरवार,महेंद्र कोठारे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक संतोष बडगे यांनी अथक परिश्रम घेतले.