वरोरा:- राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधानसभा माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वरराव टेमुर्ड यांचे (२२जानेवारी) सकाळी निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा पण केला असल्याने . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे त्यांचे देहदान करण्यात आले . २३ जानेवारीला स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले असून या शोक सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .