असंख्य महिलांची उपस्थिती
भद्रावती :- महिलांनी स्वतःमधील कुवत ओळखून सर्व क्षेत्रात पुढे यायला पाहिजे. कारण समाजकारण व राजकारणाची कास धरून विकास रुपी चेहरा रवींद्र शिंदे या मतदार संघाला लाभले असून त्याच्या नेतृत्वात या विधानसभा क्षेत्रातील शिववसैनिक जनता जनार्धनाच्या पाठीशी सैदव उभा असेल असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रा . शिल्पा बोडखे यांनी व्यक्त केले .
हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती व मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी चंद्रपूर यांचा विद्यमाने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात वरोरा व भद्रावती तालुक्यात हळदी कुंकू तसेच स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.याच कार्यक्रमाचं एक भाग म्हणून आज (दि. १९) ला भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील किसान भवन येथे स्नेहमिलन सोहळ्याचा ३रा दिवस संपन्न झाला या स्नेहमिलन सोहळ्याला उदघाटक म्हणून त्या उपस्थित होत्या .
यावेळी आपल्या उदघाटणीय भाषणात त्या बोलत होत्या . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडी प्रमुख नर्मदा बोरेकर, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे मंचावर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया नारळे, माजी नगराध्यक्ष नगरपरिषद भद्रावती तथा वरोरा भद्रावती विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर डुकरे , भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, प्रदीप देवगडे उपसरपंच ग्रामपंचायत घोडपेठ, सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई शिंदे, सरोज रामटेके ग्रामपंचायत सदस्य घोडपेठ, अश्विनी ताजणे माजी पंचायत समिती सदस्य भद्रावती आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतिभा मांडवकर सरपंच महाडोळी तसेच प्रास्ताविक भास्कर ताजने व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर डुकरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता धनराज गनफाडे, अमित निमकर , संजय सूर , अमोल कारेकर तथा शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले .
भारतीय संस्कृतीत महिला -भगिनींना देवदेवीतांची उपमा दिलेली आहे. संत व थोर विचारवंतांच्या मते ज्या परिवारात आणि ज्या समाजात माता, महिला व भगिनींचा नेहमी मानसन्मान होतो. त्या ठिकाणी ईश्वरी शक्ती नांदत असते. त्या परिवाराची व समाजाची सर्वच दृष्टीने भरभराट व प्रगती होते. त्यामुळे महिला -भगिनी व सर्वसामान्य जननतेला योग्य न्याय मिळाला पाहीजे. त्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहीजे .यासाठी महिला -भगिनी व सर्वसामान्य जननतेच्या रक्षणासाठी शिवसैनिक सदैव तत्पर राहील. असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी केले