भामरागड :-भामरागड अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त तालुका आहे या तालुक्यातील 128 गावातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यातआणि तालुक्यात गंभीर व दीर्घ आजाराने होणारा मृत्यू दर कमी व्हावा या उद्देशाने तालुक्यातील ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीतील मोठ्या गावात शासकीय आरोग्य संस्था सुरु करण्यात आले आहे, मात्र तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील अनेक गावात नाममात्र आणि काही आरोग्य केंद्र हि शोभेची वास्तू बनलेली आहे. गावातील या आरोग्य संस्थांना काहीही महत्व नाही एवढेच नव्हे तर तालुक्यात मोठं मोठे आरोग्य विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी तालुक्याला भेट देतात येथील समस्याही जाणून घेतात मात्र तालुका सुटला कि सर्व विसरून जातात तसेच बहुतांश अधिकारी व प्रतिनिधी फक्त औपचारीकता म्हणून येतात ते सह कुटुंब भामरागड तालुका गाठतात आणि येथील पर्यटन स्थळाचा मनसोक्त आनंद लुटून चालले जातात. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकारीही याकडे पाठ फिरवून बसले आहेत. कारण भामरागड तालुक्यात कुठल्याही वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी येतो तर त्यांचा मुख्य उद्देश पर्यटन क्षेत्रांना भेटी देणे हेच असतात त्यामुळे भामरागड तालुक्याबद्दल गांभीर्य कोणालाच नाही हे नेहमी लक्षात येते. मागच्या वर्षी 22 नोव्हेंबर 2022 ला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. बनिता जैन यांनी भामरागड तालुक्याचा दौरा केला यादरम्यान भामरागड तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावरील प्राथमिक आरोग्य गथक ताडगाव चे दयनिय अवस्था बघून या पथकाचे समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र त्यांनी दिलेले आश्वासन हे फक्त औपचारीकताच ठरली आहे कोणत्याही आरोग्य संस्थेत वैद्यकीय अधिकारी व त्यानंतर औषध निर्माण अधिकारी यांचे सर्वात महत्वाचे काम करत असतात मात्र ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाचे औषध निर्माण अधिकारी मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रतिनियुक्तीवर जिल्हा औषध भांडार गडचिरोली येथे कार्यरत आहे यातून त्यांचे पेसा क्षेत्रातील कामाचे वर्षहि पूर्ण होत आहे आणि यांना प्रत्यक्ष भामरागड तालुक्यात राहावे पण लागत नाही आहे असा सुंदर व संशोधनात्मक पॅकेज यांना यांच्या सेवेत देण्यात आलेला आहे त्यामुळेयेथील नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. औषध निर्माण अधिकारी कविता दांगट
यांना प्रतिनियुक्ती देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा यांना 28जून 2021 ला पत्र दिले आणि त्यानंतर दिनांक 24 नोव्हेंबर 2021 वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आरेवाडा यांनी कविता दांगट यांना भारमुक्त केले. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात व जिल्हा
औषध भांडार गडचिरोली येथील कामे प्रलंबित असल्याने व रेकॉर्ड संगणिकीकृत करायचा असल्याने पुढील आदेशापर्यंत
अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती देण्यात आले होते मात्र त्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द होण्याचा मुहूर्त आजपर्यंत निघाला नाही.संबंधित औषध निर्माण अधिकान्यावर कार्यवाही तर सोडा त्यांना आपण जिल्ह्यातून भारमुक्त सुद्धा करू शकत नाहीत तर यात आपली कोणती नामुष्की आहे याची कल्पना आम्हाला व तालुक्यातील सर्वसामान्यांना मिळवता पाहिजे नाहीतर आपल्या यंत्रनेवरून सर्वसामान्यांचा विश्वास गेल्यावाचून राहणार नाही तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी कविता दांगट यांना बारंबार पाठीशी
आहेत याची माहि आम्हाला आवश्यक आहे. भामरागड
तालुक्यात कर्तव्यावर असणारे जिल्ह्यातील किंवा जिल्हाबाहेरील जे कोणी अधिकारी व कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत त्यांना व त्यांच्या कौटुंबियांनाहि काही न काही अडचणी तर असणारच मग प्रत्येकाला कविता दांगट यांच्यासारखा पॅकेज दिले तर या तालुक्यात काम कोण करणार आणि जर कविता दांगट यांना अश्याप्रकारे सूट देता आले तर तालुक्यातील इतर कर्मचाऱ्यांवर तर हा अन्याय आहे ना तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे तर याना विशेष सूट का कोणत्या विषयाचे वाचा फोडन्यासाठी ट्राइबल फोरम मार्फत ट्रायबल फोरम चे महिला जिल्हाध्यक्ष भारती वसंत इष्टम यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना पत्राद्वारे माहिती मागविले आहे याबाबतीत प्रसार माध्यमानी अनेकदा विस्तृत बातमी प्रकाशित केले मात्र जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी मूग गिळून बसले आहेत हे मात्र सत्य आहे.