सुमित हेपट यवतमाळ:मारेगाव तालुक्याला मनसेला तालुका अध्यक्ष या रूपाने अविनाश लांबट लाभले होते. कार्यकुशल नेतृत्वाने नावारूपास आलेले लांबट विविध समस्यांना घेऊन शासन दरबारी मांडत होते. आणि समस्यांना मार्गी लावीत होते. कृषीपंपाणा वीज , ग्रामीण भागातील विविध समस्या असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडण्याचे कार्य करीत होते. या वर्षी झालेल्या अतिवृष्ठीने आणि बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामाने शेतपिकांचे नुकसान झाले यांची शासनाकडे नुकसान भराई मिळावी करीत मागणी रेटून धरणारे पहिले राजकीय हस्तक ठरले. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष आहेत. शासन दरबारी पाठपुरावा करून कामे मार्गी लागावित हा त्याचा अथक परिश्रम असतो. परंतु मनसेच्या तालुका अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा चर्चेचा विषय बनला आहे.
मारेगावं तालुक्यातील महागाव येथील अविनाश लांबट उपसरपंच आहेत. यासह मनसे या राजकीय पक्षात कार्यरत आहेत त्यांना काही महीण्याआधी तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती. परंतु या पदाचा त्यांनी त्याग केल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. अशातच त्यांच्या मातोश्री मरण पावल्या घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. व्यवसायासह , शेतीची धुरा सुद्धा त्यांच्यावर आली आहे. परंतु जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य अविरत चालू ठेवनार असल्याचे त्यांचा निकटवतियांनी सांगितली. सरपंच परिषदेची तालुक्याची धुरा सांभाळतांना अष्ठपैलू कार्यपद्धती ने लांबट यांनी तालुक्यासह उपविभागात चांगली ख्याती मिळविली आहे. बेबळा प्रकल्पग्रस्त समिती गठीत करून हजारो शेतकऱ्यांना एका छत्रात जमविनारा एकमेव माणूस ठरला. आणि त्या बैठक व्यवस्थेत लोकप्रतिनीधीना स्वतः हुन यावे लागले होते. तेव्हा जनतेच्या रोषाला समोर जावे लागले असताना अविनाश लांबट यांनी भक्कम बाजू मांडून हा लढा बेंबला प्रकल्पाकरिता आहेत. आपले नुकसान झालेत आपणच लढा द्यायचा असल्याचे शेतकऱ्यांना संबोधित करून मन जिंकले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरिता लढा देताना जिल्हा दरबारी वाऱ्या केल्यात यावर तोडगा न निघल्याने शेतकरी या नात्याने आमरण उपोषान करणार असल्याची माहिती मिळाली. जनतेकरीता असलेली धडपड अविरत असणार असून जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.शेती आणि व्यवसाय करतांना मोठ्या पदावर कार्यरत राहून त्या पदाची कामे करतांना वेळ देता येने फार महत्त्वाचे असते. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडायची असते. परंतु आता मला शक्य होत नसल्याने मी पक्षश्रेष्ठींकडून राजीनामा सोपविला आहे तरी माझी जनसेवा अविरत राहणार असल्याची माहिती अविनाश लांबट यांनी सह्याद्रीचा राखणदारला दिली.