वरोरा : वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तसेच मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे व पूर्व विदर्भ महिला संघटीका व प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांचा मार्गदर्शनात नर्मदा दत्ता बोरेकर चंद्रपूर जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसेना यांच्या विद्यमाने महिला आघाडी तर्फे वरोरा तालुक्यातील माढेळी येथे असंख्य महिलांच्या उपस्थितीत भव्य हळदी कुंकू व स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला .
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरेकर ,उदघाटक म्हणून सुषमाताई शिंदे . प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, जेष्ठ शिवसैनिक बळीराम चवले,माढेळी ग्रामपंचायत उपसरपंच जयाताई हुलके . वरोरा उप-तालुका प्रमुख अरुण महल्ले, महिला आघाडी उप-जिल्हा प्रमुख मायाताई नारळे , भद्रावती महिला शहर प्रमुख शीला आगलावे, माढेळी ग्राम पंचायत सदस्य महेश देवतळे, नीलिमा दरवडे, वर्षा महाजन, भडगरे व गोपाळ देवतळे जेष्ठ शिवसैनिक, वरोरा महिला तालुका संघटक मुरस्कर , तालुका महिला समन्वयक सरला मालोकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले ,स्व . बाळासाहेब ठाकरे , स्व .मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून करण्यात आले . त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले . उपस्थित महिलांना मकरसंक्रांती निमित्त वाणाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाडोळी येथील सरपंच प्रतिभा मांडवकर तर प्रास्ताविक सरला मालोकर यांनी केले . माला ढेंगळे यांनी स्वागत गीत गायन केले तर आभारप्रदर्शन पुष्पा उईके यांनी केले.यावेळी सदर उपक्रमांच्या माध्यमातून वरोरा व भद्रावती तालुक्यातील महिलांमध्ये आपली संस्कृती जपून, सामाजिक समरसता व एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात या ठिकाणी होणार कार्यक्रम
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आयोजन करण्यात आले असून . याची सुरवात आज (१६ जानेवारी) पासून माढेळी येथून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असून , नागरी, घोडपेठ, वरोरा, शेगाव (बु), भद्रावती, कोंढा, बोर्डा, मांजरी, खांबाडा , टेमुर्डा, चोरा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे