वरोरा : शहरातील ज्योतिबा फुले चौक येथील एका जनरल दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होत असल्याच्या गुप्त माहिती वरोरा पोलिसांनी धड टाकून एकूण 1 हजार रुपयाचा प्रतिबंधित मांजा जप्त केला आहे.
शहरातील ज्योतिबा फुले चौक येथील जितेंद्र नरुले यांच्या घरी असलेल्या के जी. कलेक्शन जनरल दुकानात नायलॉन मांजा बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली असता धाड टाकून झडती घेतली असता दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळून आला.याप्रकरणी दुकान मालक कुणाल रमेश गांधी वय 29 वर्ष ज्योतिबा फुले वार्ड वरोरा यांचेवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 सहकलम 188 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून एकूण 1 हजार रुपयाचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार व त्यांच्या टीम ने केली असून पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.