वरोरा :गेल्या पावसाळ्यात तालुक्यात अतीवृष्टीमुळे अनेक गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेकांच्या शेत्या पाण्याखाली गेल्या. पिकांचे नुकसान झाले. म्हणून राज्य शासनाने अतीवृष्टी मदत जाहीर केली. काहींच्या खात्यात रक्कम जमा देखील झाली. मात्र बरेच महिने लोटून देखील तालुक्यातील तुमगाव, खापरी, बोपापूर येथील काही शेतकऱ्यांच्या खात्यात अतीवृष्टीची मदत जमा झालीच नाही. परिणामी आज (दि.११) ला येथील तहसील कार्यालयात तुमगाव, खापरी, बोपापूर येथील शेतकऱ्यांनी संतप्त होवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) चे वरोरा विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
तहसिलदार यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता ताबडतोब संबंधित तलाठी शेळकी यांना बोलावून समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले.
यावेळी सर्व शेतकरी यांनी रवींद्र शिंदे, दत्ता बोरेकर व तहसीलदार यांचे आभार मानले.
विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांना कोणत्याही शासकीय समस्या असल्यास शिवसेनेशी (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.