वरोरा : वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख पदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती होताच पक्षात नवचैतन्य संचारले आहेत. ज्येष्ठ व युवा शिव सैनिकांना सोबत घेवून त्यांचे कार्य सुरू झाले आहे. त्यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षातर्फे प्रमुख नियुक्त्या होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख यांचे आदेशाने वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक संपर्क अभियानाला आज (०९ जानेवारीला ) पासून सुरवात करण्यात आली .
या अभियानाची सुरवात वरोरा तालुक्यातील शेगाव जिल्हा परिषद गटात संपुर्ण शिवसैनिकांच्या घरी भेट देण्यात येत आहे . यावेळी नवनियुक्त वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, खेमराज कुरेकार माजी उपाध्यक्ष वरोरा नगरपरिषद, डॅा नरेद्रं दाते , किशोर मडावी हे सोबत होते .या दरम्यान शेगांवाचे राजु राऊत उपतालुका प्रमुख, चंद्रशेखर कापटे, अभिजीत रायपुरे, सचिन मेश्राम, फारुख शेख, प्रतिभा लाजेवार , मनिषा पटेल, शारदा नागपुरे व लता वैद्य यांचे समवेत सर्व शिवसैनिकाना शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पक्षाचे ८०% समाजकारण व २०% राजकारण पक्षाचे ध्येयधोरण याबाबत व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांच्या कार्यकाळात केलेली लोकहितार्थ कामे व कोरोना काळात संपूर्ण राज्यातील जनतेचे कुटुंब प्रमुख म्हणुन घेतलेली जवाबदारी, कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी दिलेले निर्देश व राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय याबाबत संपूर्ण माहीती जनतेपर्यंत पर्यंत पोहचविणे , पक्ष सघंटन मजबुतीने वाढविण्याच्या दुष्टीने कार्य व नव्या जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच या प्रसंगी गजानन ठाकरे शहरप्रमुख यांचा अपघात झाला असल्याने त्यांची भेट सुध्दा घेण्यात आली. त्याचे सोबत जिल्हापरिषद गट तेथे विभागप्रमुख, पंचायत समिती गण तेथे उपविभाग प्रमुख, ग्रामपंचायत तिथे शाखाप्रमुख, एक हजार ते आठशे मतदार तिथे बूथ प्रमुख, आणि बीएलऐ गटात-गणात व ग्रामस्थान मध्ये जाऊन संवेदनशिल गावागावात जाऊन शिवसेना पक्ष संघटन, तथा उध्दवजींचे विचार गावागावात घराघरात पोचवून स्थानिक लोकांबरोबर विचार विनिमय करून त्यांच्या मधूनच पदाधिकाऱ्यांच्या नेमणुक अभियान राबविण्यात येणार आहे. या वेळी गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक गट-गण-ग्रामपंचायत मध्ये पदनियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती शिवसैनिकांना तसेच पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.रवींद्र शिंदे यांच्या भेटीने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य बघावयास मिळत आहे .