श्री. गुरुदेव सेवा मंडळ, जामगाव (खुर्द) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४व्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य
वरोरा :तालुक्यातील श्री. गुरुदेव सेवा मंडळ, जामगाव (खुर्द) येथील सामुहिक प्रार्थना मंदिर परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४व्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून आदर्श विवाह आज (दि.३) ला संपन्न झाला. सदर विवाह स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविन्द्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारा विदेही सदगुरू श्री. संत जगन्नाथ महाराज जनजागृती, प्रबोधन सामाजिक उपक्रमाअंतर्गत नियोजित करण्यात आला होता.
वरोरा तालुक्यातील जामगांव खुर्द येथील चि.सौ.का. राधा विजय गुडधे व यवतमाळ जिल्ह्यातील धामणगाव रोड, मोहा येथील वैभव श्रावण येरके यांचा शुभविवाह संपन्न झाला.यावेळी व्यासपिठावर माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, वरोरा विधानसभा प्रमुख (स्वतंत्र प्रभार) रविन्द्र श्रीनिवास शिंदे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान मोझरीचे अध्यक्ष लक्ष्मण गमे, हेमराज कुरेकार, दत्ता बोरेकर, प्रमोद डाहुले, प्रकाश घागी, विनोद मालू, चंद्रकांत दांडेकर, मुन्ना शेख, आशिष घुमे, सरपंच गणेश घागे, मोहन पाचभाई, नत्थुजी झाडे, ईश्वर झाडे, अनिल झाडे, सेवानिवृत्त शिक्षक मारोती झाडे, गजानन पाचभाई, दौलत बुरडकर, रोशन पारखी, किशोर घागी, सचिन खिरटकर, आकाश विधाते, विक्रम कुरेकार, अशोक कुरेकार आदी उपस्थित होते.
राधा आणि वैभव हे दोघेही वेगवेगळ्या जातीची आहेत. मात्र जातीपातीच्या भिंती तोडून सामाजिक एकता निर्माण करण्याचा आदर्श या दोघांनी निर्माण केलेला आहे. व यांना ट्रस्ट द्वारे साथ देण्यात आली आहे.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे विदेही सदगुरू श्री. संत जगन्नाथ महाराज जनजागृती, प्रबोधन सामाजिक उपक्रमाअंतर्गत कोरोनाने मृत झालेल्या, आत्महत्याग्रस्त, गोरगरीब, अनाथ, शेतकरी, शेतमजूर यांच्या मुला मुलींचा निःशुल्क विवाह लावून देण्याचे कार्य सुरू आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी केले आहे.