गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरीत दुग्धव्यवसाय करणारा विलास सुधाकर कारेकर वय (४०) याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ माजली नागरिकांनी पाहण्यासाठी नदीकडे धाव घेतली.
पोंभुरणा तालुक्यातील मोहाळा येथील विलास गोंडपिपरीत भाड्याने राहून दुग्धव्यवसाय करतो तो काल दि.(२१) बुधवारी गावाकडून रात्री गोंडपिपरी जायला निघाला पण पोहचलाच नाही दि.(२२) सकाळी वढोली अंधारी नदीवर फिरायला गेलेल्या काही युवकांना मृतदेह दिसला लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू ,पीएसआय धर्मराज पटले,पोलीस कर्मचारी सरजू कातकर,पवार ,कोवे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढुन युवकाची ओडख पटवून शवविच्छेदनासाठी पाठवले.MH34 BH4323 या दुचाकीपासून मृतदेह २५ ते ३० फूट अंतरावर असून चप्पल मात्र पुलावर रक्त लागलेल्या स्थितीत असल्याने सोबतच पुलाच्या कठड्याला रक्त लागून असल्याने व विलास निर्व्यसनी असल्याने अपघात किव्हा आत्महत्या नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केल्या जात आहे.विलासच्या पच्यात आई-वडील,भाऊ ,बहीण,पत्नी,मुलगा,मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.घातपात आहे की अपघात पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करत आहे.