हजारो भाविंकांचा सहभाग
भद्रावती :- स्थानिक बाजारवार्ड येथील विठ्ठल मंदिर परिसरात संत स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा व शिवलिंग मुर्ती स्थापना दिनाचा दहावा वर्धापन दिन सोहळा नुकताच भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळयात हजारो भाविक मंडळींनी सहभाग घेतला.
याप्रसंगी दि. ३० ऑक्टोंबर रोजी संत स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा व शिवलिंग मुर्तीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीत विविध धार्मीक द्दश्यांचे सादरीकरण करण्यात आले. विविध गावच्या भजनी दिंडया सहभागी झाल्या होत्या.सदर पालखी मिरवणूकीचा शुभारंभ विठ्ठल मंदिरापासून करण्यात आला. मिरवणूकीचा मार्ग विठ्ठल मंदिर – संत झिंगुजी महाराज मंदिर -जुना बसस्टॉप – परत विठ्ठल मंदिर असा होता.
दि. ३१ ऑक्टोबर रोजी किर्तन, काला , महाप्रसाद व सुगम संगिताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात शहरातील व ग्रामीण परीसरातून आलेले सात ते आठ हजार भाविक मंडळी स्वयंप्रेरणेने सहभागी झाले. हा सोहळा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, वामनराव बोरकर, संजू कल्ले,पप्पु उपलंचीवार, कुणाल चौधरी, उमेश डंभारे, लुकेश बोरकर, प्रशांत बेलफुवार व रितेश उपलंचीवार यांच्या मार्गदर्शनात पार पडला. सोहळा यशस्वी करण्यासाठी नकुल शिंदे, संदिप कल्ले, मनोज पापडे, निखील नरूले, तेजस कुंभारे, अनिरुद्ध डंभारे, अक्षय शिंदे,रजद शिंदे, अनिरुद्ध महालक्ष्मे आणि प्रज्वल नामोजवार यांनी विशेष सहकार्य केले.