मारेगाव :- मारेगाव तालुका पत्रकार संघाचे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघामध्ये विलीणीकरण करण्यात आले. मारेगाव येथील किन्हेकर सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नरांजे, कायदेविषयक सल्लागार ऍड. राजेंद्र सिंग, आणि विदर्भ संघटक निलेश ठाकरे उपस्थित होते.
मारेगाव तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर धानफुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेमध्ये मारेगाव तालुका पत्रकार संघ हा वरिष्ठ पातळीवर एखाद्या योग्य संघटनेशी जुळलेला असावा असा सर्वच प्रतिनिधीचा मतप्रवाह होता. त्याला अनुसरून राष्ट्रीय पातळीवरील पुरोगामी पत्रकार संघटनेमध्ये सर्वांनी जुळायचे असे सामूहिकरित्या ठरले. याच अनुषंगाने दि.19 ऑक्टोबरला या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व जुन्याच प्रतिनिधीना पुन्हा त्याचप्रमाणे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच मोरेश्वर ठाकरे यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केल्या गेली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून भास्कर धानफुले,तालुका अध्यक्ष सुमित हेपट, तालुका सचिव माणिक कांबळे, उपाध्यक्ष भास्कर राऊत, सहसचिव भैय्याजी कनाके, कोषध्यक्ष सुरेश पाचभाई, संघटक धनराज खंडरे, प्रसिद्धी प्रमुख आनंद नक्षणे,सदस्य म्हणून सुरेश नाखले, गजानन आसूटकर, गजानन देवाळकर, सुमित गेडाम उपस्थित होते.