भद्रावती :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भद्रावती येथे चार दिवशीय राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, व इतर सामाजिक तथा सांस्कृतिक स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेला आज (दि. १६) ला भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भेट दिली.
राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा तथा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना भद्रावती या ऐतिहासिक शहरात ट्रस्ट तर्फे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देवून जिल्ह्याचे तसेच भद्रावती शहराचे नाव देशात पोहचले आहे, असे मत देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले व ट्रस्टच्या सामाजिक कार्याची स्तुती केली.मंचावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रवींद्र शिंदे , भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विवेक बोढे, बी.एम. देहारकर, धनराज आस्वले, भैयाजी मिरगे, गजानन उताणे, प्रदीप महाकुलकर, गजानन पांडे हे उपस्थित होते.
देवराव भोंगळे व रवि शिंदे यांचे जुने सामाजिक व राजकीय संबंध आहेत. त्यांचा पारिवारिक स्नेह आहे. या संबंधांना या भेटीच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते