वरोरा : युवा पिढीमध्ये दिवसेंदिवस अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळे युवकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असून गंभीर आजाराचे प्रमाण वाढल्याचे प्रतिपादन नागपूर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अतुलकर यांनी केले . वरोरा येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित युवा पिढी आणि अमली पदार्थ या विषयावर ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक नवले, दहशतवाद विरोधी पथका च्या पोलीस निरीक्षक सुनिता मेश्राम, उपनिरीक्षक अर्चना बुध यांची उपस्थिती होती.
युवकांना मार्गदर्शन करताना प्रदीप अतुलकर म्हणाले की, आज देशातील युवा पिढी ही मध्य तसेच तंबाखू आणि धूम्रपानाच्या सेवनामध्ये गुंतलेली लक्षात येते. देशाच्या महानगरांमध्ये युवक हे अमली पदार्थांचे सेवन करताना निदर्शनास आले आहे ही बाब युवा पिढी करिता अतिशय गंभीर असून यात देशाचे मोठे नुकसान असल्याचे ते म्हणाले. अमली पदार्थांच्या सेवनांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून यातून मिळणारा पैसा हा आपल्याच देशाच्या विरोधात दहशतवाद पसरविण्याकरता वापरला जात असल्याचेही अतुलकर म्हणाले. याप्रसंगी बोलताना दीपक नवले यांनी युवकांना याबाबत जागृत राहण्याचे आवाहन करीत आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांवर युवकांनी नजर ठेवावी. त्यामुळे दहशतवादाला आळा बसेल तसेच युवा पिढीबद्दल मध्ये वाढत असलेल्या गंभीर आजाराबद्दल चिंता व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रशांत खुळे यांनी तर आभार प्राध्यापक रवींद्र पवार यांनी मानले. प्रा धनंजय पारके, प्रा प्रमोद बेलेकर आदींनी आदींची उपस्थिती याप्रसंगी होती.