गोंडपिपरी : (सुरज माडुरवार) – तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे अहिल्यादेवी शारदा महिला मंडळ तर्फे हळदी-कूंकवाचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला . पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांचा ५० कोटी वृक्ष लागवडीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवी शारदा मंडळांतर्फे पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्व महिलांना रोपांची ओटी भरून पर्यावरणाचा संदेश दिला.साधारणत: प्रत्येक ठिकाणी ब्लाऊज पीस,केळीची ओटी भरत असतात यावेळी महिलांची समाजशील वृत्ती,व्यापक परिवर्तनवादी दृष्टिकोन दिसून याला.आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी माजी जि.प.सदस्या वैष्णवी अमर बोडलावार, सरपंचा लक्ष्मी बालूगवार ,मंडळाचे अध्यक्ष संगीता अम्मावार, महाकाली अन्नावार, कांता बोर्लावार,संजना अम्मावार, ऊषा निलावार, गीता गंपलवार,रूपाली बालूगवार, चंदा कंकलवार, बिरूबाई देवावार,पद्मा कंकलवार,सुनीता माडूरवार,आदींची उपस्थिती होती.