राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सि.एम.– डॅशबोर्ड गुजरात यांचा अभ्यास करण्यासाठी दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रस्तावित अभ्यासगटाने अहमदाबाद येथे भेट दिली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उद्योग मंत्री . उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापक जयश्री भोज, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आशिष कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची उपस्थिती होती.
यावेळी गुजरातच्या सनदी अधिकारी, मा मुख्यमंत्री यांच्या सचिव अवंतिका सिंग, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी एम. डी. मोदीया, . योगेंद्र देसाई, प्रशांत त्रीपाठी, एनआयसीचे वरिष्ठ तांत्रीक संचालक आनंद शहा, वरिष्ठ प्रणाली विकासक शैलेश खनेश यांनी गुजरात शासनाच्या सि.एम. डॅशबोर्डबाबत सादरीकरण केले.
सि.एम. डॅशबोर्ड गुजरात यांचा अभ्यास करण्यासाठीच्या अभ्यासगटाने सि.एम. डॅशबोर्ड बाबात विस्तृत माहिती जाणून घेतली. या डॅशबोर्डच्या आधारे महाराष्ट्रातही सि.एम. डॅशबोर्ड ही संकल्पना कशी राबविता येईल यादृष्टीने अभ्यासगटातील सहका-यांच्या मदतीने प्रयत्न करू असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.