चंद्रपूर (सुरज घुमे ):- सदाशिव ताजने यांचे कार्य धडधाकट माणसाला पण लाजविणारे आहे, त्यांचे आनंदवनातील पदार्पण आणि माझी कार्याची सुरुवात 1971 पासून सुरू झाली,स्वरानंदवनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कार्यक्रम महाराष्ट्र भर त्याने केलेली आहेत. ताजनेकडून प्रत्येकांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन आनंदवनाचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले, औचित्य होते . आनंदवनातील विश्वस्त तथा स्वरानंदवनचे मुख्य व्यवस्थापक सदाशिव ताजने यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. गोविंद कासट लिखित ” बाबा आमटे यांच्या आनंदवनातील सदाशिव ताजने ”
या पुस्तकाचे 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. विकास आमटे यांचे हस्ते त्यांच्या निवासस्थानी पार पडले.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई, डॉ. भारती आमटे , ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद कासट,प्राचार्य. सुभाष गवई ,माजी नगरसेवक प्रभाताई आवारे, उमा कासट, आनंदवनाचे आरोग्य अधिकारी डॉ विजय पोळ, विश्वस्त सुधाकर कडू ,माधव कवीश्वर,ज्येष्ठ नागरिक संघाचे सोनेकर , पराते, अशोक मगरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ताजने यांचा डॉ. विकास आमटे व लेडीगव्हर्नर कमलताई गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. गोविंद कासट आपल्या भाषणात म्हणाले ,डॉ. विकास आमटे यांच्या यावर्षी अमृत महोत्सवानिमित्त अमरावतीकरांसाठी 12 महिन्याच्या भेटीचे आयोजन करण्यात आलेले असून ही 11 व्या महिन्याची भेट आहे, येणाऱ्या 27 ऑक्टोबरमध्ये शेवटची 12 महिन्याची भेट असून या 12 भेटीवर डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सव म्हणून पुस्तक प्रकाशन करण्याचे ठरविलेले आहे, हे सर्व घडवून आणण्यासाठी आम्हाला सदाशिव ताजने हे महत्वाचे दुवा म्हणून काम करतात , याशब्दात त्यांनी गौरवाउद्गार काढलेले होते.
कार्यक्रमानंतर स्वरानंदवन मध्ये पाहुण्यांना संगीत कार्यक्रम सुद्धा दाखवीण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. गोविंद कासट यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश ताजने यांनी मानले.