वरोरा :- क्षयरोग नियंत्रणा करिता महाराष्ट्र शासन क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवित आहे. परंतु पाहिजे तसे यश संपादित करता आले नाही. परीणामी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानचा शुभारंभ आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात करण्यात आला.
अभियानाची माहिती देतांना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. साठे यांनी चंद्रपूर जिल्हातील रुग्णाची स्थिती त्यांना उपचार घेत असताना येणाऱ्या आर्थिक व सामाजिक अडचणी त्याकरिता नि-क्षय मित्राचे महत्त्व विषद केले.
समाजाचे टी.बी रुग्णांना ला सहकार्य उपक्रमाची माहिती देताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सामाजीक संस्था, कार्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सी एस आर) विभाग, मंडळे, मान्यवर नागरिक यांनी पुढाकार घेत जवाबदारी घेत रुग्णास अतिरिक्त मदत करण्याचे आवाहन केले व स्वतः 10 रुग्णांच्या प्रोटीन युक्त आहार ची जवाबदारी घेतली.
संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मार्फत गावातील टी.बी रूग्णांना दत्तक घेत त्यांना प्रोटीन युक्त आहारा करीता अतिरीक्त मदत करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या. मान्यवरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लब वरोरा तर्फे 6 रुग्णांना दत्तक घेत प्रोटीन युक्त आहार किट देण्यात आली. ग्रामसेवक संघटनेतर्फे 2 , सुभाष आमदार प्रतिनिधी सुभाष दांडदे यांच्या तर्फे एका रुग्णास, वरोरा तालुका फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे, डॉ. अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक, डॉ बाळू मुंजानकर, व्यापारी असोसिएशन तर्फे दादा जयस्वाल यांनी जवाबदारी घेत किट वाटप केली.
या कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक गोविंद कुंभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका वैधकीय अधिकारी डॉ मुंजनकर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमाकांत जवडे, प्रियांका रॉय, मनीषा कडवं व सादिया खान यांनी सहकार्य केले.