गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- संपूर्ण राज्यासह अनेक जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीज हा जलद गतीने पसरणारा रोग आढळून येत आहे या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी -विक्री वाहतुकीमुळे इतर जिल्ह्यात पसरू नये यासाठी दि.१५ सप्टेंबर पासून गोंडपिपरी बैल बाजार बंद ठेवण्यात आला आहे .मात्र ही परिस्थिती जास्त काळ राहिल्यास बाजार समिती व शेतकरी दोघांचेही मोठे नुकसान होणार त्यामुळे लवकरात लवकर लंपी रोगावर लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून तहसीलदार के डी मेश्राम यांना केले आहे. यावेळी बाजार समिती सभापती सुरेश चौधरी,संचालक शंभू येलेकर, अभय शेंडे ,अनंता कुंदोजवार, हर्षवर्धन पिंपरे,जिजाबाई फुलझले,भारत झाडे यांच्यासह प्रतिष्टीत शेतकरी अजय माडुरवार,भाऊजी चनेकर यांची उपस्थिती होती