कारंजा (घा):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व वूशु स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे स्व. राजीव गांधी मेमोरियल इंग्लिश हायस्कूल व जुनियर कॉलेज कारंजा घाडगे येथे वुशू मार्शल- आर्ट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरा मध्ये शाळेतील 150 विद्यार्थी सहभागी झाले होते.पंधरा दिवसाच्या या शिबिरामध्ये वुशु या खेळाचे महत्व व फायदे आणि वूशू खेळा बद्दल अधिक माहिती सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले. दिनांक 20 सप्टेंबर २०२२ मंगळवारला या शिबिराचे समापण करण्यात आले व शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमा ला प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका माने , राष्ट्रीय युवा उदय संस्था नागपूरच्या अध्यक्षा व शाळेच्या संस्थापिका अरुणा चाफले, मुख्यधापक जनार्दन धोटे व वूशु स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश राऊत उपस्थित होते.प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सर्व १५० विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आला.या शिबीराचे प्रशिक्षण राज्यस्तरीय वूशू खेडाळू शिवानी देवासे व रजत देवासे यांनी दिले.या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन रोशन बोबडे यांनी केले तर आभार रजत देवासे यांनी मानले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.