वरोरा:– लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे वाणिज्य विभागातर्फे २० सप्टेंबर रोज मंगळवार ला वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड अँड शेअर मार्केट या विषयावर मार्गदर्शन विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभोधकुमार सिंग होते तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद निकेतन महाविद्यालयातील प्रा. प्रमोद न.सातपुते हे होते.
या कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना आर्थिक गुंतवणूकी बद्दल माहिती देण्यात आली गुंतवणूक का करावी? कशी करावी? आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात आपण गुंतवणूक करू शकतो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मध्ये कशी गुंतवणूक करावी.म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मध्ये कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच गुंतवणूक करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या बद्दल चे उत्तम मार्गदर्शन प्रा.प्रमोद सातपुते यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रीती पोहणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.प्रियांका येडे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा.नितेश जोगी,प्रा.सचिन बदखल यांनी सहकार्य केले.तसेच या कार्यक्रमाला लोकमान्य महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.