वर्धा (राहूल मुन ):-जिल्ह्यातील हिंगणी त.सेलू येथे झालेल्या विर छावा संघटना युवा आघाडीच्या सभेत संस्थापक अध्यक्ष . श्रीकांत दोड यांच्या आदेशावरून विदर्भ अध्यक्ष कुणाल लोणारे यांच्या मार्गदर्शनात वर्धा जिल्हाध्यक्ष नंदु मुन यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष आकाश सुखदेवे यांच्या नेतृत्वात विर छावा संघटना युवा आघाडी सेलू तालुका अध्यक्ष पदी कार्तिक चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली.
.कार्तिक चहांदे यांना राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव राहिला आहे. सेलू तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना संघटनेला तळागळाच्या कार्यकर्त्या सह जन सामान्य व्यक्ती पर्यंत संघटनेला पोहचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्तिक चहांदे यांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दोड, विदर्भ अध्यक्ष कुणाल लोणारे, विदर्भ संपर्क प्रमुख संजय आचार्य, वर्धा जिल्हा अध्यक्ष नंदु मुन, वर्धा जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी आकाश सुखदेव यांचे आभार मानले.
कार्तिक चहांदे यांचं आकाश कुंभरे, रवींद्र परसें, अतुल सातघरे, आदील शेख, बांधलं कुंभरे, सौरभ देशमुख, अतुल ढोले, रितिक वाघाडे, प्रतीक वाघाडे, धीरज बावणे, दुशात चहांदे व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले .