कोरची :- येथील बाजार चौकातील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवारी सायंकाळी तान्हापोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील व शहरातील विविध २७ बालकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपंचायत अध्यक्षा हर्षलता भैसारे ह्या होत्या तर उदघाटक दल्लुजी फुलकवर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच सरजू जमकातन, निबंधक अधिकारी डी शिरगावे, भाजप तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामाणी, नगरपंचायत बांधकाम संभापती कु तेजस्विनी टेंभूर्णे, नगरसेवक धर्मा नैताम, गड काँग्रेस कमेटी माजी जिल्हा उपाध्यक्ष सदरुद्दीन भामाणी, नगरसेवक दिलीप शामलाल मडावी, पुजारी बलदु नैताम, नगरसेवक मनोज अग्रवाल उपस्थित होते.
सदर स्पर्धेत बालकांनी लाकडी व मातीची नंदी रंग रंगोटी करून सजवून आणले होते. ह्या तान्हापोळाच्या स्पर्धेत सजवून आणलेल्या नंदीचे निरीक्षक म्हणून कोरचीचे प्रा.एम.रुखमोडे, शिक्षिका त्रिवेणी गायकवाड व राकेश मोहूर्ले हे होते ह्या स्पर्धेतील बालकांची नंदींचा निरीक्षण करून तिघांही निरीक्षकांनी दिलेल्या मार्कवरून यामधील सर्वाधिक सुंदर सजावट करून मातीपासून बनवलेली नंदीला पहिली पसंती मिळाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणारा बेडगाव येथील यश मेश्राम ला गडचिरोली काँग्रेस कमेटी माजी उपाध्यक्ष सदरुद्दीन भामाणी यांनी स्वतःकडून सहखुशीने पाच ग्रॅम चांदीच नाणं दिला तर आयोजकांनी ठरवल्याप्रमाणे प्रथम येणाऱ्यास अकराशे एक रुपये रोख बक्षीस, द्वितीय क्रमांकवर युवांश मेश्राम ला सातशे एक रुपये तर तृतीय क्रमांकावर यश अग्रवाल व दीपक मेश्राम यांना पाचशे एक रुपये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर प्रत्येक स्पर्धकांना पेन बॉक्स व बिस्कीट पुड्याचे वाटप करून मनोबल वाढविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शिक्षक हिरामण मेश्राम यांनी केले आहे.