गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- आज दि.१५ आगष्ट २०२२ रोजी देश भरात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव ध्वजारोहण करून थाटात साजरा करण्यात आला.
स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून गावातील १२ वी प्रथम क्रमांक मिळविलेल्या साहिल हरिचंद्र वाढई या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याला ध्वजारोहण करण्याची संधी देण्यात आली.साहिल हा मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा येथील विध्यार्थी अभ्यासात हुशार असल्याने सोबतच शिकण्याची आवड असल्याने तो महाविध्यालयीन शिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर येथील भवांजीभाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला परिश्रमाने बारावीत सुयश प्राप्त करत ७९.५० % गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकीवला.विद्यार्थ्यांमध्ये शिकण्यासाठी स्पर्धा निर्माण व्हावी गावातील विध्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्राम पंचायत सदस्या कोमल फरकडे,प्रभाकर कोहपरे यांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे हा विषय मांडला व सरपंच भाग्यश्री आदे, उपसरपंच हरिदास मडावी,सदस्य प्रतिमा चंद्रगिरीवार, पुष्पा राऊत ,माया कोहपरे पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते ठराव मंजूर केला आणि गुणवंत विद्यार्थ्याला ध्वजारोहणाची संधी दिली या ऐतिहासिक उपक्रमाचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे