भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शारीरिक शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १४ ऑगस्ट रोज रविवारला योगी अरविंद सभागृहात विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गीतगायन, समूहगायन, समूहनृत्य, एकलनृत्य, पथनाट्य, वक्तृत्वस्पर्धा, परीसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.अमोल ठाकरे, प्रा.श्रीकांत दाते यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाटे यांनी उपस्थितांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकानंतर सुरू झालेल्या या कार्यक्रमात वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ.रमेश पारेलवार, आभारप्रदर्शन डॉ
गजानन खामनकर यांनी केले.