गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.सुरेश रेवतकर
हे 20 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले .या निमित्ताने त्यांचा निरोप समारंभ विद्यापीठ सभागृहात बुधवार ला आयोजित करण्यात आला होता. मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे,संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ.अनिल चिताडे ,नवनियुक्त विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. राजीव वेगीनवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. सुरेश रेवकर यांचा सत्कार केला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, कामाच्या प्रती समर्पित असलेले व्यक्तिमत्व म्हणून कुठल्याही कामात त्यांनी कधी नाही म्हटलं नाही. त्यांना त्यांच्या कार्या व्यतिरिक्त मॉडेल कॉलेज , प्लेसमेंट सेल , ही कामे दिली. कामात आलेल्या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी त्यांच्या कामाचा रिझल्ट दिला . त्यासाठी स्वतःला वाहून घेतले. भविष्यातही त्यांना लखलखीत यश मिळेल अशी शुभेच्छा व्यक्त करतो.
सत्कारा प्रसंगी बोलताना डॉ. सुरेश रेवतकर म्हणाले, मॉडेल कॉलेज , अधिष्ठाता म्हणून केलेली कामे , प्लेसमेंट सेल अतिशय जबाबदारीने पार पाडली. माझे विश्व शून्यातून निर्माण झाले आणि आज गोंडवाना विद्यापीठा चा अधिष्ठाता म्हणून निवृत्त होतोय.
यावेळी कर्मचारी संघटनेचे सचिव सतीश पडोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक उपकुलसचिव कामाजी देशमुख, आणि प्रा. देवदत्त तारे यांनी केले.
आभार कामाजी देशमुख यांनी मानले.