वरोरा(गणेश उराडे ):- तालुक्यात सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यातील करंजी या गावाला पुराणे वेढा घातला असून नागरीकांच्या घरात पाणी घुसले आहे.
धरणाचे दरवाजे उघडले असल्यामुळे वर्धा नदीच्या काठावरील सर्वच गावाना पुराणे वेढले आहे अक्षरशः करंजी या गावाला पुराणे वेढा घातला आहे.
रात्री च्या सुमारास पाण्याच्या प्रवाह अचानक वाढत असल्यामुळे रात्री करंजी गावातील जुन्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना तालुक्यातील आपात्कालीन विभागाकडून रेस्कू ऑपरेशन करून लोकांना नवीन वस्तीत स्थलांतरित करण्यात आले.अजूनही लोकांना पुराच्या बाहेर काढणं चालू आहे तालुक्यातील आपात्कालीन विभाग त्या ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे.