मारेगाव(गजानन देवाळकर ):- तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात कायमस्वरूपी सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्याचे सदोष कामामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मार्डी या गावी सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी मारेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अविनाश लांबट होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती संजय आवारी मारेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे, सरपंच रविराज चंदनखेडे,मार्डीचे माजी सरपंच भास्कर धानफुले उपसरपंच सुरेश लांडे ,अभिजित मांडेकर, सरपंच प्रवीण नान्ने, राहुल आत्राम, रामचंद्र जवादे,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुमित हेपट प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या चार दिवसा पासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच कुंभा,मार्डी परिसरातील बेंबळा प्रकल्पाचे कालवे फुटून शेतीपिकाचे नुकसान झाले आहे.सदोष कामामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणी साठी ही सभा मार्डी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात पार पडली. यावेळी बेंबळा प्रकल्पग्रस्त शेतकरी हक्क संघर्ष समिती गठीत करण्यात आली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगाम कसा करावा याबाबतचे मार्गदर्शन कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी केले.सूत्रसंचालन भास्कर राऊत यांनी केले, यशस्वीतेसाठी दिलीप खेकारे, सुमित जुनगरी, सतीश ताजने,वसंत ताजने, साईनाथ बावणे, प्रदीप डाहुले, यासह सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.