गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने मुलचेरा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
व्हिडिओ बघा
मुलचेरा तालुक्यात आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाला. पहाटे 5 वाजेपासून तर सतत 11 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. या तालुक्यातून वाहणारा दिना नदीसह इतर छोटे मोठे सर्व नाले तुडुंब भरून वाहत असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. अल्लापल्ली ते मुलचेरा रस्त्यावरील गोमनी, आंबटपल्ली, भवानीपुर आणि बारसवाडा तर मुलचेरा ते आष्टी रस्त्यावरील कोपरअली जवळील दीना नदीला पूर आल्याने हा मार्ग अक्षरशः बंद झाला आहे.
एकंदरीत अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा,भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यातील बरेच गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुलचेरा तालुक्यातील बरेच गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने खूप मोठा नुकसान झाल्याचे दिसून आले. तालुक्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी नदी नाल्यावर पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. आज शनिवार असल्याने तालुका मुख्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी मुख्यालयातच अडकले आहे. नदी नाल्यावरील पूर परिस्थिती कमी झाल्याशिवाय रहदारी सुरू होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.