प्रकरणातील संशयीत सह आरोपी ताब्यात, मुख्य सूत्रधार फरार
देसाईगंज :- शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी लगत बंद अवस्थेत असलेल्या गौरव पेपरमिल पाणी पुरवठा योजनेच्या ट्युबवेल मध्ये २२ वर्षीय तरुणीचे प्रेत तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान सदर तरुणीची प्रेमप्रकरणातुन हत्या करण्याच्या उद्देशाने कमरेला दगड बांधून पाणी पुरवठा योजनेच्या ट्युबवेल मध्ये फेकून दिल्याने कमरेपासून खालचा भाग तरंगताना आढळून आला आहे तर कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग अद्यापही पाण्याखालीच असुन ट्युबवेल मध्ये भरपूर पाणी असल्याने प्रेत बाहेर काढण्यात आले नाही.मात्र या प्रकरणाशी संबंधित संशयित आरोपीस देसाईगंज पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणातील मुख्य आरोपी देसाईगंज येथील रहिवासी असून फरार होण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देसाईगंज शहराच्या हनुमान वार्डातील रहिवासी असलेल्या मुख्य आरोपीचे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील ब्रम्हपुरी येथे शिक्षण घेत असलेल्या एका युवतीशी प्रेम जुळले.होते.दरम्यान दोघांच्याही भेटीगाठी सुरु असता सदर मयत मुलिने पटलेकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मुख्य आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याने आपल्या मार्गातील अडसर दुर करण्याच्या उद्देशानेच सदर तरुणीच्या कमरेला दगड बांधून पाणी पुरवठा योजनेच्या ट्युबवेल मध्ये फेकून दिल्याने पाण्यामुळे गुदमरून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संदर्भात आज (७) जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास संबंधित प्रकरणाशी संशयित आरोपी यास ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने घडलेला घटनाक्रम सांगुन घटनास्थळ दाखवले.माहितीच्या अनुषंगाने तपास करण्यात आले असता ट्युबवेल मध्ये तरुणीचे प्रेत तरंगताना आढळून आल्याने त्यांनी लगेच याबाबत ब्रम्हपुरी पोलिसांना माहिती दिली.ब्रम्हपुरी पोलिसांनी हे प्रकरण देसाईगंज येथील युवकाशी संबंधित असल्याने देसाईगंज पोलिसांना माहिती दिली असता सदर धक्कादायक घटना उघडकिस आली.यावरून ब्रम्हपुरी पोलिस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
जुलै २०२१ पासून तरुणी होती बेपत्ता
सदर तरुणी २०२१ मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार घरच्यांनी ब्रम्हपुरी पोलिसांत दिली होती. त्यावरून पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता लोकेशन देसाईगंज टाॅवर दाखवित असल्याने ब्रम्हपुरी पोलिसांनी तपास देसाईगंज पोलिसांकडे सोपविला होता. पण वर्षभरापासून तरुणी मिळाली नव्हती आज अखेर तिचा मृतदेह मिळाला
.