मुख्य कार्यालयातून(आशिष घुमे) :-पुण्यातील संचेती हॉस्पिटल मध्ये दाखल असणारे सोमय्या यांना आज 6 फेब्रुवारी रोज रविवारला डिस्चार्ज मिळाला.त्यांच्या मार्फत पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली.माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही असे ट्विट करीत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून सकाळी 10 वाजून 13 मिनिटांनी पलटवार केला आहे.
पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला
पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली
माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही pic.twitter.com/iN77lhb6eH
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 6, 2022
हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाहेर येतांना प्रसार माध्यमान्नी घटने बाबत विचारले असता.माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असून त्यासाठी गुरुवारी दिल्लीत जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. सोमय्या यांना महापालिका परिसरात रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्याच सोबत त्यांनी मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. असे ही ट्विट करीत एफ आय आर ची प्रत जोडली आहे.
मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत.
FIR एफआयआर क्रमांक
आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ @BJP4Maharashtra pic.twitter.com/2gqqtJE7EU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 6, 2022
ट्विट मध्ये जोडलेल्या एफ आय आर मध्ये किरीट सोमय्या यांच्या वतीने प्रशांत दत्तू लाटे यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनं येथे तक्रार दिली. पोलिसांनी शिवसेना पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे,पदाधिकारी चंदन साळुंके,किरण साळी,सुरज लोखंडे आकाश शिंदे रुपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्या विरुद्ध आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ गुन्हा दाखल केला आहे.