पहिल्या आवर्तनात साधारण १३१ दशलक्षघनफुट पाणी वापरात येणार आहे. नंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २५० दशलक्षघनफुटचे दोन आवर्तने होतील असा अंदाज आहे.
कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली.यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
जलसंपदाचे उपविभागीय अभियंता योगेश जोर्वेकर, शाखा अभियंता रजनीकांत कवडे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, रामहरी कातोरे, माजी सभापती दादापाटील वाकचौरे, पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे, शिवाजी पाटोळे, चंद्रभान कडलग, वसंत देशमुख, सुधीर शेळके, अशोक रहाटळ, जालिंदर बोडके, राम सहाणे, तुकाराम गोर्डे, पिंपळगाव निपाणी, धांदरफळ, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, जवळे कडलग, हिवरगाव, विरगाव, देवठाण, डोंगरगाव, निमगाव, निमगाव भोजापूर, चिखली, चिकणी या परिसरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बीसाठी दोन आवर्तन सोडले जाणार असून दिनांक ०७ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत पहिल्या वर्तनामध्ये १३१ दलघफु पाणी देण्यात येणार आहे. दुसरे आवर्तन आवश्यकतेनुसार ५ मार्च रोजी सुरु होणार असून २८ मार्च पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वर्तनामध्ये २५० दलघफू पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित २५० दलघफू पाणी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन एप्रिल मध्ये सोडण्यात येणार असल्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी वाचून दाखवले.
आढळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी दहा कोटी मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकर टेंडर पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कालव्याची स्पेशल रिपेरिंग फंडातून दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे पाणीवाटपात सुसूत्रता येणार असून पाण्याची गळती थांबेल आमदार डॉ. किरण लहामटे.