ए.जी कंन्ट्रक्शन कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची चर्चा
गोंडपिपरी : गोंडपीपरी – आष्टी महामार्गावर महामंडळाच्या बस आणि ट्रकचा समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला सदर घटना शनिवार दि.२ जुलै सकाळी ९ वाजताच्या सुमारास g ए.जी कंन्ट्रक्शन कंपनीच्या साईड ऑफिस समोर घडली.
विडिओ बघा
अहेरी कडून नागपूरला जाणारी बस क्रमांक एम.एच.४० ए क्यू.६३९५ व समोरून येणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच.३४ बी.झेड १२५२ या दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला. सद्या स्थितीत नवेगाव ते आष्टी रोडचे बांधकाम सुरू असल्याने रस्ता दुभाजक व दिशा दर्शक फलक न लावताच काम सुरू असल्याने या ठिकाणी हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे कंत्राटदारांच्या निष्काळजी पणामुळे हा अपघात झाला असून अशाप्रकारचे अनेक अपघात झाले आहे.मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे . अपघातात दोन्ही वाहनांचे फारमोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवित हानी टळली,बसचा चालक हा गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथील मानपल्लीवार असून ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे . पुढील तपास ठाणेदार राजगुरु करीत आहे
नवेगाव ते आष्टी रोडचे बांधकाम ए. जी कंन्ट्रक्शन करत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध मुरमाचा वापर केला आहे.त्यामुळे मार्ग चिखलमय झाला आहे.कामाच्या ठिकाणी कुठेही सायडिंग बांधून नाही. सोबतच दिशा दर्शक फलक सुद्धा सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी नसल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. अपघातानंतर तीन तास वाहतूक बंद होती.अनेक अपघात त्या ठिकाणी घडत आहे.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे –
सुरज माडुरवार शिवसेना तालुका प्रमुख गोंडपिपरी