गोंडपिपरी/सुरज माडुरवार:- गेल्या वर्षभरापासून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे ए.जी कंट्रक्शनचे काम सुरू आहे.तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या सायडिंगला मुरमाची परवानगी नसल्याने गिट्टीचा वापर करण्यात येत आहे फक्त नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गावर पैसे बचतीसाठी शासनाची दिशाभूल करून येन पावसाळ्यात रात्रीचा फायदा घेत अवैद्य मुरूम मोठ्या प्रमाणात कामावर वापरण्यात येत आहे.परिणामी पाऊस आल्याने मार्ग चिखलमय झाला आहे.अशातच परिवहन मंडळाची बस रविवारी मूरमाचा अंदाज न समजल्याने फसली पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.सोबतच या मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कुठेच सूचना दिशादर्शक फलक किंवा काम सुरू असल्याबाबत सुरक्षा कठडे नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून सदर मार्ग मरणमार्ग ठरत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहे
नवेगाव वाघाडे-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट होत आहे.सोबतच मार्गावर मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून आहे काम संतगतीने सुरू असून प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.प्रशासनाने लक्ष द्यावे
-नितेश मेश्राम काँग्रेस तालुका उपाध्यक्ष गोंडपीपरी