वरोरा :- आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन वरोरा च्या माध्यमातून परसोडा येथे स्व. वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजे कृषी दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवडू गारघाटे कार्यक्रमाचे उदघाटन रमेश पावडे उपसरपंच ग्रा. प. परसोडा व प्रमुख पाहुणे म्हणून शुभम आमने अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ, परसोडा वैशाली कुरेकर पोलीस पाटील सुनील कुरेकर सदस्य ग्रा.प. परसोडा वाघुजी मडावी तंटामुक्ती अध्यक्ष तसेच मा.पुंडलिक कळसकर इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या फोटो ला माल्यार्पण करून करण्यात आली . हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार , कार्यक्रम समन्यक डॉ. स्वप्नील पांचभाई ,ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी डॉ. रामचंद्र महाजन , डॉ.प्रदीप अकोटर , डॉ. सतीश इमडे , डॉ. मुकुंद पतोंड यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी हनवते यांनी केले. रमेश पावडे यांनी आपल्या भाषणातुन शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पुंडलिक कळसकर यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना आणि त्याचे महत्त्व पटवून दिले त्या नंतर शुभम आमने यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनवरची एक कविता गायली आणि भाषणातून प्रत्येक शेतकऱ्यांने कृषी दिन साजरा केला पाहिजे.आणि शेतकऱ्यांने वीस रुपये. किमतीच्या पाणी बॉटल खरेदी करते वेळी आपल्या शेतात पिकवीत असलेल्या गव्हाची किंमत वीस रुपये आहे याची खंत शेतकऱ्यांने लक्षात घेतली पाहिजे असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. त्यानंतर आनंद निकेतन कृषी महाविद्यालय च्या विद्यार्थीनींनी शेती विषयक माहिती शेतकऱ्यांना दिली. यामध्ये काजल कपगते हिने महिला सक्षमीकरन ,तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली. तसेच प्राजक्ता हटिटेल हिने पिकांचे तंत्रज्ञान प्रसरण बद्दल माहिती दिली. आणि पुजा कड, प्रतिष्ठा खाडे, ऋतु गिरी यांनी कृषी संजविनी मोहिमेबद्धल शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी हनवते यांनी केले तर आभार ऋतुजा गिरी यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आला.