चिमूर :- तालुक्यातील शाळा महाविद्यालय सुरू झाली असून शाळांमध्ये सरकारप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये बंडखोरी सुरू असून विद्यार्थी बंडखोरी करून या शाळेमधून त्या शाळेमध्ये जाताना दिसून येत आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी खाजगी शाळा तसेच जिल्हा परिषद शाळा यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असून विद्यार्थी मिळविण्यासाठी व वर्गात टिकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे
नवीन वर्ग सजविण्यासाठी व शाळेतील नोकरी टिकविण्यासाठी खाजगी तसेच जि प शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे वारंवार भेटी देत आहेत व विविध प्रकारचे प्रलोभने विद्यार्थ्यांना व पालकांना देताना दिसतात खाजगी शाळा प्रमाणेच जिल्हा परिषद शाळेमध्ये हि शिक्षक हे वया बुके पुस्तके व शालेय ड्रेस छत्री व बाहेरून प्रवास करीत असल्यास मोफत सायकल देण्याचे कबूल करत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकां मध्ये बंडखोरी वृत्ती निर्माण झाली असून विद्यार्थी हे या शाळेमधून दुसऱ्या शाळेत जाताना दिसून येत आहेत.
अशा प्रकारामुळे शाळेतील शिक्षणाचा दर्जा शाळेतील शिस्त याचा विचार न करता पालक हे शिक्षकांच्या प्रलोभनाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे .