वरोरा : – डिमांड काढून देण्यासाठी पैशाची मागणी करण्याऱ्या महावितरणच्या लाचखोर सहायक अभियंत्याला चंद्रपूर लाचलुचपत विभागातर्फे ६ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे . https://youtu.be/VKQAyfmDgu4
वरोरा महावितरण शहर कार्यालयातील सहाय्यक अभियंता श्रीणु बाबू चुक्का असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार वरोरा येथील राहवासी असून सोलर सिस्टीम फिटिंग व इलेकट्रीशन चे काम करतो. तक्रारदार यांनी ग्राहकांच्या घरी (सोलर सिस्टम) किट लावण्याचे काम घेतले होते. त्यासाठी लागणारे डिमांड काढून देण्याच्या नावाखाली लाचखोर अधिकारी श्रीणु बाबू चुक्का यांनी दिनांक २४ जून रोजी तक्रारदार यांचे कडे ६ हजार रुपयांची मागणी केली. वारंवार होत असलेल्या पैश्याच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली असता.
दि. २७ जून रोजी सापळा रचून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस उपयुक्त/पोलीस अधीक्षक ला.प्रा.वि नागपूर राकेश ओला, ,अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्रा.वि नागपूर मधुकर गीते तसेच पोलीस उपाधीक्षक अविनाश भामरे ला.प्रा.वि चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिल्पा भरडे, कार्यालयीन स्टाफ नरेश नन्नावरे, रवीकुमार ढेंगळे, राकेश जांभुळकर, वैभव गाडगे व चालक सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पडली.
सदरच्या कार्यवाहीच्या लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी,कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.