चिमूर :- शंकरपूर येथे 2005 पासून काही निसर्गप्रेमी युवक पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने सर्पमित्र म्हणून काम करतात. तब्बल 17 वर्षा नंतर त्यांना अतिशय दुर्मिळ असलेला पांढऱ्या रंगाचा धामण जातीचा साप मिळाला अशी माहिती येथील सर्पमित्र व प.स.गोंडपीपरी येथे विषयतज्ञ असलेले विजय गजभे यांनी दिली.
शंकरपूर येथील लक्ष्मण शेरकी यांची शेती गावालगत कांपा रोड वर आहे. १९ जूनला सकाळी ते व त्यांच्या घरचे सदस्य, मजूर कापड पिकाची लागवड करण्यासाठी शेतावर गेले होते .काही वेळात शेरकी यांना लावणी करीत असतांना काही अंतरावर पांढऱ्या रंगाचे चे काही तरी हलतांना दिसले त्यांनी प्लास्टिक असेल म्हणून याकडे दुर्लक्ष केले , परंतु काही वेळात त्यांचे लक्षात आले की ते प्लास्टिक नसून साप आहे. पांढरा रंग पाहून त्यांना मोह आवरता आला नाही,त्यांनी लगेच मोबाईल वर एक फोटो घेत याची माहिती त्यांचे मित्र ढगेश बरडे यांना मदेऊन फोटो सेंड केली. ढगेश बरडे यांना ही आश्चर्य वाटले व त्यांनी त्यांचे मित्र सर्पमित्र विजय गजभे यांना फोटो सेंड केले, व त्यांना लगेच कॉल केला, गजभे यांनी कोणताही विलंब न करता त्यांचा मुलगा रितेश गजभे याला घेऊन शेत गाठले. व त्या सापाला रेस्क्यू केले, तो पर्यंत तिथे साप पाहण्यास आजू – बाजू च्या शेतातील मजुरांची गर्दी झाली होती.
त्यानंतर या सापाला लगेच जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले, यावेळी सर्पमित्र विजय गजभे, नितीन बैस, अभिशेक चंदनखेडे, रितेश गजभे, सोहेल शेख व राहुल सुरणकर हजर होते.
मी मागील 17 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करतो परंतु आज पर्यंत मला कोणताही पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ साप सापडला नाही. हा साप धामण जातीचा असून याला शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा म्हणतात कारण हा शेतातील उंदरांची संख्या नियंत्रित करीत असून हा साप बिनविषारी गटात मोडत असून यापासून मानवास काही धोका नाही.हजारो – लाखो सापा मागे असा एखादा दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा साप जन्म घेतो.जन्मतःच याच्या शरीरात मेल्यालीन या रंगद्रव्याच्या कमतरता असल्यामुळे हा पांढऱ्या रंगाचा दिसतो याला पाहणे ही आश्चर्यकारकच आहे. हजारो-लाखो सापात असा एखादा दुर्मिळ साप जन्मास येतो.
सर्पमित्र विजय गजभे