वरोरा :- गेल्या अनेक वर्षांपासून वरोरा ते चिमूर मार्गाचे काम सुरु आहे . या कामाचे कंत्राट एसआरके नामक कंपनीला मिळाले . कासवालाही लाजवेल एवढ्या गतीने हे काम सध्या सुरु असून येथील अभियंत्यांच्या कल्पनाशक्तीला तर तोडच नाही . जगातून टॉपर असलेल्या या अभियंत्यांच्या अनेक चुका नागरिकांच्या जीवाशी बितल्या जात आहेत . एवढे सगळे होऊनही यांना सर्वोत्कृष्ट महामूर्ख अभियंता पुरस्कार अजून कोणी बहाल केला नाही? हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता कधी सुरळीत चालू होणार? असा प्रश्न मागील पाच वर्षांपासून वाहनचालकांना नेहमीच पडत असतो.
आज तर या अभियंत्यांच्या कामाची कमालाच झाली . आनंदवन चौक पर्यंत केलेल्या अर्धवट कामामुळे .व उर्वरित ठिकाणी मातीमिश्रित मुरूम टाकल्याने दोन्ही बाजूचा रोड चिखलमय झाला आहे . रस्त्यावर सर्वत्र मातीच माती पडली असल्याने गाडीचा ब्रेक मारला की, गाडी स्लिप होऊन अनेकजण पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे . मोठी दुर्घटना जरी घडली नसली तरी मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारा हा प्रकार बघून नागरिकात कंपनी व्यवस्थापनविरोधात आणि त्यांच्या महामूर्ख अभियंत्यांविरोधात रोष निर्माण होत आहे . सामाजिक हिताच्या या लोकहितवादी सोयीकडे दुर्लक्ष करणाऱ्या या नालायक अभियंत्यांना एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने वा संस्थेने महामूर्ख अभियंता हा पुरस्कार दिल्यास नवल वाटू नये एवढंच.यांच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान होत आहे याला जबाबदार कोण?उठसुठ लहानसहान मुद्यावरून आंदोलन करणारे चमको आंदोलनवीर झोपेत आहे की झोपेच सोंग घेऊन आहेत असा नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे.