भद्रावती :- स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात बी.कॉम, बी. ए. च्या अंतीम वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात एका निरोप आला. या समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य , डॉ. एन. जी. उमाटे होते. प्रमुख मार्गदर्शक प्रा. धनराज आस्वले होते. डॉ. विजय टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार मांडताना प्रा. आस्वले यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थी जीवन म्हणजे एक आयुष्यातील अविस्मरणीय काळ असतो. हा काळ ज्ञानाबरोबरच आत्मभान व समाजभान देण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे ज्ञान, आत्मभान आणि समाजभान घेऊन आपण आपल्या पुढील जीवनाचा विकास करावा आणि महाविद्यालयाशी ऋणानुबंध कायम ठेवून महाविद्यालयाशी जुडून राहावे आणि ज्या पद्धतीने आपल्याला महाविद्यालयाच्या विकासात योगदान देता येईल त्या पद्धतीने योगदान द्यावे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानाहून बोलताना प्राचार्य उमाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात कायम शिस्त राखावी आणि प्रामाणिकपणे कार्य करावे म्हणजे तुमचा विकास होईल आणि समाजामध्ये पद आणि प्रतिष्ठा तुम्हाला निर्माण करता येईल.
याप्रसंगी सुनील शेंडे, सागर वानखेडे, आनंद पंडीले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभाचे प्रास्ताविक डॉ.ज्योती राखुंडे यांनी केले, याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौरभ चामाटे, नेहाल चौधरी, कुणाल बलकी, रोहित सिडाम, आशिष अंबाघरे, प्रणय रामटेके, विशाल बोंडे, शरद खाडे पल्लवी आस्वले, अंकिता काकडे, सुयोग वाघमारे, चेतन नागपुरे, प्रज्वल सातपुते, आशिष कांबळे, प्रशांत देरकर, सुमित ननावरे इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे संचालन कु. जोया शेख व सौरभ चामाटे तर आभार कु. श्रुती आकिनवार यांनी व्यक्त केले.