चंद्रपूर :- विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गती प्राप्त झालेल्या चंद्रपुरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामा संदर्भात येणाऱ्या प्रशासकीय अडचणींच्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातुन सदर उडडाणपुलाच्या कामाला गती प्राप्त होवून लवकरात लवकर उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. यात माजी मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश कामगार आघाडी महामंत्री अजय दुबे यांचा समावेश आहे.दिनांक ३.मे रोजी यासंदर्भात भास्करवार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 यांच्या दालनात या विषयासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला महारेलचे अधिकारी अक्षय ठाकरे व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुलाच्या कामाला गती देत त्वरे ने रेल्वे उड्डाण पुल पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे बैठकीत ठरले. सुधारित अंदाजपत्रकानुसार 20 कोटी रु निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल तसेच रेल्वे बोर्डाचे सदस्य यांना रेल्वे विभागाशी सम्बंधित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी चंद्रपुर येथे आमंत्रित करण्यासाठी समिती प्रयत्न करेल असेही बैठकीत ठरले . आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडुन वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात येईल असेही समिती च्या बैठकीत ठरले.