वरोरा :- मद्यपाश आजाराला बळी पडलेल्या लोकांसाठी काम करणा-या अल्कोहोलीक्स अनानिमस या संघटनेची एक शाखा असलेल्या वरोरा येथील समर्पण समुहाला स्थापन होजुन चार वर्ष पूर्ण झाल्यामुळे या समुहाचा 4 या वपन दिन सोहळा येत्या 5 जुन 2022 रविवारला साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून . प्रतिभा धानोरकर आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र या उपस्थित राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणून अहेतेशाम अली. माजी नगराध्यक्ष न.प. गरोरा व डॉ. पवन डोंगरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
1934 मध्ये अमेरिकेतील या संस्थेचे सहसंस्थापक बिल जब्त्यु हे अतिमद्यपानाने आजारी पडले तेव्हा त्याचेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना अल्कोलिझम या आजाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांची त्यांच्यासारख्याच अल्कोहोलीक व्यक्तीची भेट झाली व बिल डब्ल्यु यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटना त्यांच्यासमोर मांडल्या व ते दोघे चर्चा करीत असतांना 15 मिनीटांसाठी ठरलेली भेट काही तास चालली आणि यातून बिल डब्ल्यु यांना विचार आला की एका मद्यपीला दारूपासून दूर राहण्यासाठी दुस-या मद्यपीची आवश्यकता असते आणि त्या दोघांच्या चर्चेतुनच अल्कोहोलिक्स अॅनानिमस या संस्थेचा जन्म झाला.
आजघडीला या संस्थेच्या शाखा सर्व जगभर पसरलेल्या असुन त्याचीच एक शाखा वरोरा शहरात असून ती समपर्ण समुह वरोरा या नावाने ओळखल्या जाते. समर्पण समुह वरोराची स्थापना 1 जुन 2018 ला झाली असून या समुहाच्या मिटींग प्रत्येक आठवडयाच्या दर सोमवार व शुक्रवारला सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेस तर रविवारला सकाळी 7.30 ते 9 या वेळेस नेहरू चौकातील नेहरू उर्दु शाळेत होत असते. या मिटींगच्या माध्यमातुन आज वरोरा शहरातील हजारो लोक दारूपासुन दुर असुन त्याचे उघडयावर पडलेले संसार सुरळीत सुरू आहेत.
सदर वर्धापन दिन कार्यक्रम 5 जुन 2022 रविवारला नेहरू चौकातील नेहरू उर्दू शाळेत सायंकाळी ६ वाजता संपन्न होत असुन या कार्यक्रमाला शहरातील सर्व नागरिकांनी कुटूंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समुहाच्या सर्व सभासदांनी केले आहे. तसेच ज्यांना या मद्यपाश या समस्येने ग्रासलेले आहे त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. (उमेश के 9960818675 संजय बी.9689232171 )